Saturday, December 15, 2012

प्रेम म्हणजे काय असतं ? -मंगेश पाडगावकर

कविवर्य मंगेश पाडगावकरांची हि कविता एकदा ऐकली की कायम मनात गुणगुणत राहते...

प्रेम म्हणजे काय असतं ?

 प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे,फसल्या तर फसू दे!
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
 कॉनव्हेन्टमध्ये शिकलात तर्री प्रेम करता येतं;
सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
 जागेपणी स्वप्नाचे झोपाळे झुलू लागतात!

आठवत ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
 होडी सगळी पाण्याने भरली होती!
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो!
बुडलो असतो तरी चाललं असतं,
प्रेमानेच वर अलगद काढलं असतं!
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं!
कारण,  
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात 
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात!
असाच एकजण चक्क मला म्हणाला,
" आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही!
 आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?"
त्याला वाटलं मला पटलं!
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!"

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉंक्लेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने!
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास 
फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल!

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यानीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा!!
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं 
गट्ठ गट्ठ मिठीसुद्धा प्रेम असतं!
 प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
 -मंगेश पाडगावकर 



मंगेश पाडगावकर यांच्याविषयी थोडं...

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला) हे मराठी कवी आहेत. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते.
विशेष प्रसिद्ध कविता
  • अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
  • फिदी फिदी हसतील ते?
  • दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
  • आम्लेट
  • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
  • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
  • सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
  • सलाम
  • फ़ूल ठेवूनि गेले
  • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?


Tuesday, December 11, 2012

पेरावे तसे उगवते

पेरावे तसे उगवते  
कर भला, हो भला 
आपण जे करतो, वागतो, बोलतो तेच फिरून  आपल्याला मिळते. प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल तेवढेच किंबहुना, त्याहून थोडेसे कमी जर इतरांसाठी केले तर बरेच प्रश्न सुटतील. हा व्हीडीओ जरूर पहा.
क्लिक करा. A few minutes

Saturday, November 03, 2012

चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है


चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है
हमको अब तक आशिकी का वोह ज़माना याद है
चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है 
  
खींच ले ना वोह मेरा परदे का कोना दफ्फतन 
और दुपट्टे से तेरा वोह मुंह छुपाना याद है
हमको अब तक आशिकी का वोह ज़माना याद है 
चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है
 
दो पहर की धुप में मेरे बुलाने के लिए
वोह तेरे कोठे पे नंगे पॉँव आना याद है
हमको अब तक आशिकी का वोह ज़माना याद है 
चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है

बेरुखी के साथ सुनना दर्द ए दिल की दास्तान
वोह कलाई  में तेरा कंगन घुमाना याद है
हमको अब तक आशिकी का वोह ज़माना याद है 
चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है

वक्ते रुकसत अलविदा का लफ्ज़ कहने के लिए
वोह तेरे सूखे लबों का थर थराना याद है
हमको अब तक आशिकी का वोह ज़माना याद है 
चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है

आगया अगर वस्ल की शबभी कही ज़िक्रे फिराक 
वोह तेरा रो रो के अभी मुझको रुलाना याद है 
हमको अब तक आशिकी का वोह ज़माना याद है 
चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है
                                         -गुलाम अली 


Thursday, October 25, 2012

अरे , संसार संसार - बहिणाबाई चौधरी


अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तव्हा मिळते भाकर !
 
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू  नही
राउळाच्या कयसाले , लोटा कधी म्हनू नही
 
अरे, संसार संसार, नही रडनं , कुढनं
येडा, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !
 
अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोडामधी कडू , बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा 
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
 
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चीक्नेसागरगोटे
 
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !
 
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
 
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !
                                   - बहिणाबाई चौधरी


Saturday, July 07, 2012

फटका - अनंत फंदी

फटका - अनंत फंदी 

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण, धरुनी निखालस, खोटा बोला बोलुं नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको
नास्तीतकपणी तूं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउं नको
आल्या अतिथा मुठभर दाया मागेपुढती पाहू नको
मायबापावर रुसू नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवाहारामधी फसूं नको
परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी करु नको॥१॥
 
वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर‌याचा ठेवा, करनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा धनाढ्याही, गर्वभार हा वाहू नको 
एकाहन चढ एक जगामधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गरिब गुरिबांला तूं गुरकावुं नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथां घेउं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको॥२॥
 
उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
बरी खुशामत शाहणयाचि परी मुर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरेची चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधी विटू नको
असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आतां तुज गुजगोष्ट सांगतो. सत्कर्मा तूं टाकुं नको
सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरु नको
दैत्याला अनुसरु नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती - नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको॥३॥

Saturday, June 23, 2012

सतत आपल्या मुलासाठी झटणाऱ्या आईची महती तसे शब्दात सांगणे कठीणच..  
आईच्या वात्सल्याला पारख्या झालेल्या मनाची व्यथा सांगणारी  माधव ज्युलिअन यांची हि कविता 
 
 प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलिअन 
प्रेमस्वरूप आई!    वात्सल्यसिंधू  आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरु  मी; तू गाय, वासरु मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ?

गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,
अन्‌ राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ;

नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते ,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा,
आई हवी महणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधान्प्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे ,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे .

आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे .

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे , तूझ्यापुढे निजावे
नेती तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे !
वक्षी तुझ्या परी हे केव्हा  स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?

घे जन्म तू फिरुनी , येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !
  

माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांच्याविषयी थोडंस :

         माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (२१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा - २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. हे पेशाने फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय यांना देण्यात येते . माधव ज्यूलियनांनी दित्जू मा.जू. आणि एम ज्यूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. पटवर्धनांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादनही केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. त्यांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.
पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्गसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. इ.स. १९३९मध्ये माधव त्र्यंबक पटवर्धनांना मुंबई विद्यापीठाची डी.लिट्. ही पदवी मिळाली. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले.
माधव ज्यूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरल्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत.

Saturday, June 09, 2012

गणपत वाणी - बा .सी . मर्ढेकर

गणपत वाणी - बा .सी . मर्ढेकर 

गणपत वाणी बिडी पिताना 
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधीन माडी;

मिचकावुनी मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि  ती तशीच धयायचा
लकेर बेचव जैसा गवयी;

गि ~हाईकाची कदर राखणे
जिरे , धणे अन धान्ये गिळत,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकू न बसणे हिशेब कोळीत;

स्वप्नावरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा,
मिणिमण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा;

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते,
आडोशाला वास तुपाचा
असे झोपणे माहित होत;

काडे गणपत वाणयाने जया
हाडांची ही ऐशी केली,
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली; 

काड्या गणपत वाण्याने ज्या 
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या 
सदैव रुतल्या आणिक रुतल्या;

गणपत वाणी बिडी बापडा
पितापिताना मरून  गेला,
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला.









Sunday, June 03, 2012

प्रेम कर भिल्लासारखं

प्रेम कर भिल्लासारखं 

पुरे झाले चंद्र, सूर्य पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरे त नजर बांधून रहा

सांग तिला  तुझ्याच मिठीत आहे स्वर्ग  सारा...

शेवाळलेले शब्द यमकछंद करतील काय ?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय ?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत

नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ? 

म्हणून म्हणतो, जागा हो जाण्यापूर्वी वेळ
प्रेम  नाही अक्षरांचा भातुकळीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होवून जाळत राहणं
प्रेम म्हणजे जंगल होवून जळत जाणं ...

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमधून उगवूनसूधा मेघापर्यंत पोचलेलं
 
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुज्यावारती झेंड्यासारख फडकू नकोस

उधळू न दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं
पेम कर भिल्लासारखंबाणावरती खोचलेलं ...

Monday, May 28, 2012

एका तळ्यात होती - ग .दि . माडगूळकर

एका तळ्यात  होती

एका तळ्यात  होती बदले पिले  सुरेख
होते कुरूप  वेडे पिल्लू  तयांत एक ॥

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वाहुनी  निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप  वेडे पिल्लू  तयांत एक॥

पिल्लास  दु : ख भारी भोळे रडे स्वत:शी 
भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप  वेडे पिल्लू  तयांत एक ॥

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे   पळाले
पाणयात पाहताना चोरुनिया क्षणेक
त्याचेच तया कळाले तो राजहंस एक ॥

- ग .दि . माडगूळकर

Wednesday, May 23, 2012

मन वढाय वढाय - बहिणाबाई चौधरी

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या  पीकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखर पाखर
तयाची काय सांगू मात
आता वहत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
तयाले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जहरी जहरी
याच नयार रे तनतर
आरे इचू साप बरा
तयाले उतारे मनतर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतिब मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

-बहिणाबाई चौधरी 

Wednesday, May 16, 2012

कोशिश

 कोशिश 
चंद्रगुप्त  : "किस्मत पहले हि लिखी जा चुकी है तो कोशिश करने से क्या मिलेगा ?
चाणक्य : " क्या पता किस्मत में लिखा हो की कोशिश से ही मिलेगा."


Monday, May 14, 2012

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं

नही वार्‍यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं

पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं

निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं

ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं

येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं

नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं

अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं

दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं

इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं

ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं
- कवयित्री बहिणाबाई चौधरी  
श्रेष्ट कवयित्री बहिणाबाई चौधरी  यांचा थोडक्यात परिचय :
बहिणाबाई चौधरी (इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१) या प्रसिद्ध अहिराणी-मराठी कवयित्री होत्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
बहिणाबाई इ.स. १८८०मध्ये पूर्व खानदेशात (महाराष्ट्राच्या वर्तमान जळगांव जिल्ह्यातील) असोदा  गावी जन्मल्या. त्या अशिक्षित असल्या तरी त्यांची काव्यशैली अत्यंत प्रभावी व वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्या कवितातून निसर्ग व मनुष्याच्या आयुष्याचे सूक्ष्म बारकावे टिपले आहेत.त्यातूनच त्यांची प्रतिभा दिसून येते.
आजहि त्यांच्या कवितावर मराठी कविताप्रेमी तेवढेच प्रेम करतात, किंबहुना ते वाढतच आहे.

Wednesday, May 09, 2012

हालात के कदमो पर सिकंदर नहीं गिरता

एक असाच कुठेतरी ऐकलेला शेर
हालात के कदमो पर सिकंदर नहीं गिरता 
टुटा कोई तारा जमीं पर नहीं गिरता 
गिरते है शौक से दर्या समंदर में   
लेकिन समंदर किसी दर्या में नहीं गिरता

Saturday, May 05, 2012

I want to grow up once again ….

       I want to grow up once again ….

             When I was a kid studying in school, I always looked forward to going to school: every June meant  new uniforms, new water bottles, tiffin boxes, typical fragrance of the unopened new books, wrapping cover to new books. Completing homework and chatting with friends in lectures, and after getting caught saying some false things to teacher.  Always doing crazy stuff in free lectures, while teachers bored me to death, looking outside the window and seeing mama ring the bell and getting high on it, biting off nails just before a surprise check, fumbling big time while speaking in front of the entire assembly, feigning that I am not feeling well when I had forgotten to do something which the teacher had asked me to do and getting her sympathy instead of the howlers… In these heaps of memories, I distinctly remember this teacher telling us, “live your life my children…live your life… It is your time right now… In school, everybody knows you…you have an identity for yourself, you are unique in your own ways…it is only going to happen in school…live your life…"
             Crazy that I was, I always looked forward to college life… hanging out with friends on college katta, bunking lectures, overuse of cell phones, "crushes"… the genre of books changed from harry potter, to that thing called love, notebook… yes, I had lost my identity, yes I was but a roll no 44 of class C, FC, 2006 batch. Professors and seniors kept telling us, “live your life people… this is now…make the most of it….what you are seeing right now is but a virtual image, a mirage of the actual world…whilst you are living this protected life, live it enjoy it” but, how stupid I was! I kept saying, growing up is fun…I wonder why these people keep saying this… I want to have a job, earn a living, come out of this protective shell of my parents and take that flight of independence
              And here I am today… again I have achieved that…but my life somehow revolves around the words TGIF and after Monday and Tuesday comes WTF, my bank account is happy but as they say no gains without pains...My recognition is my employee id… I forget it and I am not allowed to go in the premises where I am spending majority of my time these days… Number of people knowing me as a person can be counted on finger tips… In this vast expanse, I have lost me, I have lost self… It is like being a waiter in hotel… your presence is mandatory and yet nobody takes notice of you… Everybody around me has started gearing up for the next phase of life…they have started grooming themselves to take up the responsibilities of life and here I am stranded somewhere in between…new horizons beckon me and yet I wish, I could be with friends in college canteen having that breakfast, I so wish I could relive those preparatory leaves again… I have made the mistake of wanting to live the future before… I don’t want to repeat it… I don’t want to lose me… I want to nurture me...I want a time turner…I want it to halt if not turn back…I want a stop clock that stops time and not measures it...I want that sunshine, I want those rains, I want that another chance, I want to grow up once again...


  

(Note : this is an edited version of an article written by my friend.)

Tuesday, May 01, 2012

महाराष्ट्र अभिमानगीत

 महाराष्ट्र अभिमानगीत 

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


         हे गीत मराठी कवी सुरेश भट यांनी लिहिले असून कौशल इनामदार यांनी त्यास संगीत दिले आहे. ३५६ गायक, एक गाणे, एक गीतकार, एक चाल, एक ताल असे या गाण्याचे स्वरूप आहे. 
         ज्याला ४५० पेक्षा अधिक कलाकारांनी आपला आवाज बहाल केला आहे, असे मराठी अभिमानगीत हे बहुधा एकमेव गाणे असावे.  हे गाणे मराठी अभिमानगीत या अल्बममध्ये ठाण्यात २७ फेब्रुवारी, इ.स. २०१० रोजी, मराठी भाषा दिनी प्रकाशित झाले.
         मराठी अभिमानगीत हे ११२ प्रथितयश गायक-गायिकांनी व ३५६ होतकरू समूहगायकांनी गायले आहे. प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर,शाहीर विठ्ठ्ल उमपपासून अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, स्वानंद किरकिरे, अजित परब, स्वप्नील बांदोडकर, मुग्धा वैशंपायनपर्यंत गायक गायिका तसेच अशोक पत्की, श्रीधर फडकेपासून मिलिंद जोशी, मिथिलेश पाटणकरांपर्यंत बरेच संगीतकार या शिवाय अमराठी असलेले गायक-गायिका हरीहरन, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर अशा अनेकांनी अतिशय प्रेमाने यात सहभाग घेतला आहे. हे गाणे मुंबई, चेन्नई व ठाणे येथील ३ स्टुडियोंमध्ये ध्वनिमुद्रित झाले आहे. या ध्वनिमुद्रणात १२ ध्वानिकी अभियंत्यांचा व ६५ वादक कलाकारांचा सहभाग आहे.
या गाण्यात २५०० हून जास्त व्यक्तींचा प्रात्यक्षिक वा अ-प्रात्यक्षिक सहभाग आहे.



महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना हार्दिक शुभेच्छा 



 महाराष्ट्र दिनानिमित्त थोडसं..

महाराष्ट्र नावाचा उगम

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महाररट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती


हुतात्मा स्मारक,मुंबई
संयुक्त महाराष्ट्र चळवळ ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली 
                                     आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

       आज याच महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे, सोन्याचा इतिहास असणाऱ्या महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. तेव्हा आज महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राला त्याचे गतवैभव पुन्हा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

Monday, April 30, 2012

I too had a love story by Ravinder Singh

I too had a love story by Ravinder Singh
            I too had a love story is a story of Ravin and Khushi which is based on the real life of Ravinder Singh. Khushi was working in an IT company in Delhi and Ravin was working in an IT company Bhubaneshwar. Ravin and Khushi met through the 20th century's great innovation computer and "www". i.e.on shaadi.com
            This is story which happened in 2006-07. Both started talking over the phone and fell in love. Later they decided to move ahead and get marry. But destiny had written something else, Khushi met an accident while coming back from office just two days before their engagement, and everything turned into a very heartbreaking scene. She passed away in the hospital after few weeks..
             I don't know why I liked the book., because of its simplicity or becasuse of commitment and respect both showed towards love, in fact there are many aspects. Everyone, who believes in love, who doesn't believe in love, who was in love, is in love or wish to be in love must read this story.. I am sure they will also like it. I have read a couple of love stories, some true, some imaginary, but all of them had a common thing-"Happy End". But this story doesn't have end at all. As Ravin says "Love story doesn't have the end"..

Saturday, April 28, 2012

सचिन 'देव' गाभाऱ्यातून बाहेर ?

सचिन 'देव' गाभाऱ्यातून बाहेर ?

भारतीय संघ त्यावेळी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. १९८९ चा तो काळ असेल. सचिन रमेश तेंडुलकरने कसोटीत पदार्पण केले होते. त्याने फार काही केले नव्हते. अर्थात तशी अपेक्षाही त्या काळी नव्हती. पण अब्दुल कादिरसारख्या बोलरला त्याने फोडले होते. त्याचवेळी गावसकर मागे पडला आणि सचिन हा नवा अवतार पुढे आला. लगेचच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने सेंच्युरी ठोकली आणि मग हा अवतार अधिकच आक्रमक होत गेला. कोणताही बोलर त्याच्या तावडीतून सुटला नाही. कोणताही देश त्याच्या आक्रमणाला थोपवू शकला नाही. शाहीद आफ्रिदी, इंजमामसारखे "प्रतिसचिन' केव्हाच इतिहासजमा झाले. पण सचिन तो सचिनच राहिला.

विक्रमांचे विक्रम करीत त्याची घौडदौड सुरू असताना, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन डेमध्ये त्याने २०० धावा केल्या आणि माझ्याप्रमाणेच जगभरातील लाखो चाहत्यांनी सचिनला "देव' मानले. सुनील गावसकर (दुर्देवाने हे स्थान त्याला मिळू शकले नाही. पण तोही त्याकाळात "देव'च होता.) मागे पडून देव्हाऱ्यात सचिनची मूर्ती ठेवली गेली. सचिन नावाचा "देव' सर्वत्र होता. त्याला "देव' मानणाऱ्या अनेकांपैकीच एक विनयकुमार नावाचा चाहता त्याची एकही मॅच चुकवित नव्हता. कोणत्याही सामन्यात हा अंगावर "सचिन तेंडुलकर' लिहून उभा असायचा. २०११ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिनने त्याच्या हाती वर्ल्ड कप दिला आणि समस्त चाहत्यांना अभिवादन केले. त्या कृतीने त्याचे देवत्व सिद्ध केले होते. आमचा "देव' कधी चुकत नाही ही आमची भावना त्यानेही जपली होती.

पैशाच्या मागे धावणारा सचिन, एक शतक ठोकता न येणारा सचिन, आता तो म्हातारा झाला आहे, त्याने रिटायर व्हायला हवे, अशा विधानांवर आमचा संताप संताप होत होता. आमचा "देव'आमचे ऐकतो, असेच आम्ही मानत आलो. म्हणूनच त्याने या सर्व "नास्तिकांना' असे फटके द्यावेत, की ते पुन्हा उठता कामा नयेत, अशीच प्रार्थना आम्ही केली. त्याने आमचा "धावा' ऐकला. "देवा'ने असे काही फटकारले की थोबाडे बंद झाली.

त्याला पद्मविभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशा अनेक किताबांनी त्याला गौरविले गेले. त्यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरून येत होता. हवाई दलात त्याला "ग्रुप कॅप्टन' केले तेव्हा तर आनंद गगनात मावत नव्हता. तो काही लढणार नव्हता, पण तरीही त्याच्या त्या कृतीने अनेकांना हवाई दलात जावेसे वाटले असेल. त्याला कधी एकदा "भारतरत्न' मिळेल याची उत्सुकतेने वाट पाहात राहिलो. पण ते काही होत नव्हते.

या सर्व लाईफमध्ये "देव' कधीच चुकला नव्हता. अगदी "मुंबई सर्वांची आहे' असे (अनेकांना) दुखावणारे वक्तव्य त्याने करूनही आम्ही त्याचे समर्थनच केले. त्याने कोट्यवधी रुपये कमविले. स्टीव्ह वॉ कोलकात्यात समाजसेवा करत असताना आमचा "देव' काहीच का करीत नाही, असा प्रश्नही आम्हाला कधी पडला नाही. ज्यांनी विचारला त्यांची तोंडेही आम्ही बंद केली. राहुल द्रविडसारखा गुणवान खेळाडू निवृत्त होत असताना, त्याच्या गौरवासाठीही हा "देव' का गेला नाही, यावरही आमच्याकडे उत्तर नव्हते. तरीही आम्ही दडपून हाणले. सिद्धीविनायक, बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात म्हणून आम्ही कधी तिथे गेलो नाही. पण शाळा, कॉलेज, नोकरी सारे काही बाजूला ठेवून, प्रसंगी पोलिसांच्या काठ्या झेलत या "देवा'चे दर्शन घेत राहिलो. "देवा'चा अपमान करणाऱ्या कपिललाही आम्ही सोडले नाही. आम्ही अंधश्रद्धाविरोधी आहोत. पण तू सत्यसाईबाबांच्या चरणी गेलास, तरी आम्ही नाराज झालो नाही. उलट तुझ्या श्रद्धेचे गोडवेच गायले.

असा हा आमचा "देव'. कालपर्यंत तो कधीच चुकत नव्हता. पण आज मात्र हा "देव'चुकला असेच वाटले. एक पायरी सोडून खाली आला आणि केवळ खासदारकी मिळावी यासाठी चक्क "10 जनपथ'च्या दाराशी गेला. एरवीही महाराष्ट्र याच पत्त्यावर लोटांगण घालत असताना, आता "देवा'नेही असेच का करावे? हा "देव' तेथे गेल्याने म्हणे राजकारण शुद्ध होणार आहे, असे म्हणणारे म्हणोत पण आम्ही काही तेव्हढे भाबडे नाही. आम्हाला आमचा "देव' या पत्त्यावर नको होता. तरीही तो तेथे गेला. ज्याची कुठेही तपासणी होत नाही त्या "देवा'ला भेटीचा परवानाही आहे ना, हे दारावरच्या सिक्‍यिुरिटीने तपासून पाहिले. मगच त्याची गाडी आत येऊ दिली. हा अपमान आमच्या जिव्हारी लागला. कारण आमचा "देव' चाहत्यांऐवजी पैशाच्या, सन्मानाच्या मागे गेला. सामान्यांचा सत्कार स्वीकारण्याऐवजी अंबानींच्या पार्टीला त्याने महत्त्व दिले. पैसा, सन्मान, किताब यासाठी तो कोणाशीही मैत्री करायला तयार आहे. "देवा'नेच गाभारा सोडला याचेच वाईट वाटते आहे.

एक निस्सीम चाहता

 खासदार तेंडुलकर यांना काही प्रश्न
1) जन्माने परकीय असलेल्या व्यक्तीस देशाचे पंतप्रधानपद देण्यास राजकीय पक्षांचा विरोध आहे. आपले मत काय?
2) लोकपाल विधेयकासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात? त्याबद्दल आपली भूमिका काय आहे?
3) कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांना शिक्षा व्हावी असे आपणास वाटते काय?
4) अफजल गुरु याला अद्याप फाशी झालेली नाही. ती तातडीने व्हावी असे आपणास वाटते काय?
5) अयोध्येत राममंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही तोडगा सुचविणार आहात काय? असल्यास तोडगा काय?
6) गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी यांना शिक्षा व्हावी असे आपले मत आहे काय?
7) काश्‍मीरप्रश्नी केंद्र सरकारने कोणती भूमिका घ्यावी असे आपणास वाटते?
8) बेळगावात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारावर आपण आंदोलन करणार काय?
9) मुंबईवर पहिला हक्क कोणाचा? मराठी माणसांचा की परप्रांतियांचा?
10) महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दिल्लीत कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात? 
(दैनिक सकाळ मधून साभार  )

Sunday, April 22, 2012

मराठी चित्रपट - अजिंठा

मराठी चित्रपट - अजिंठा 
              भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही वाकाटकचालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्मिली गेली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. एक युरोपिअन प्रवासी कॅप्टन जॉन बेंजामिन सिली याने इ.स. १८१० मध्ये वेरूळ लेण्यांना भेट दिली होती. मुंबईहून पायी प्रवास करुन तो वेरूळला पोहोचला होता. द वंडर्स ऑफ एलोरा या १८२५ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्याने वेरूळ आणि आजूबाजूच्या परिसराची इत्थंभूत हकीकत लिहिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इ.स. १८१९ मध्ये जॉन स्मिथ या ब्रिटीश कप्तानाने अजिंठा लेण्याच्या शोध लावला. 
             अजिंठा चित्रपट हा ब्रिटीश अधिकारी रोबर्ट गिल व पारो या दोघामधील प्रेम कथेवर आधारित आहे. त्याचबरोबर हा चित्रपट अजिंठा लेण्याच्या संशोधनातील सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो.  या चित्रपटातील माहितीनुसार, लेनापूर गावातील आदिवासी महिला पारोनेच या लेणी शोधल्या आहेत. तसेच या चित्रपटात अजिंठा लेण्यांच्या सौंदर्याचे एका नव्याप्रकारे दर्शन घडते. नितीन चंद्रकांत देसाई यांनी नेहमीप्रमाणे प्रत्येक बाब परिपूर्ण असण्याकडे लक्ष दिले आहे.

Monday, April 16, 2012

IPS Vishwas Nangare Patil Speech

One more speech by IPS Vishwas Nangare Patil at SIT Pune.

To watch, click here

http://www.youtube.com/watch?v=5kRwUUOmH-4&feature=related
http://www.youtube.com/watch?v=1jP3nagNxOo&feature=related

This videos are in parts I will update rest as soon as possible.

Wednesday, April 11, 2012

Wednesday, April 04, 2012

DON'T QUIT

It is really a very good inspirational poem.. Have a look..

DON'T QUIT

When things go wrong,
As they sometimes will,
When the road you're trudging seems all uphill,
When the funds are low and the debts are high,
And you want to smile, but you have to sigh,
When care is pressing you down a bit
Rest if you must, but don't you quit.
Life is queer with its twists and turns,
As every one of us sometimes learns,
And many a failure turns about
When he might have won had he stuck it out.
Don't give up though the pace seems slow
You may succeed with another blow.
Success is failure turned inside out
The silver tint of the clouds of doubt,
And you never can tell how close you are,
It may be near when it seems so far ;
So stick to the fight when you're hardest hit
It's when things seem worst that you mustn't quit.

Thursday, March 29, 2012

I always had a question What is does luck really means.
I got the answer after reading this words.
I don't know the writer's name but the words are really great.
LUCK
He worked by day
And toiled by night.
He gave up play
And some delight.
Dry books he read,
New things to learn.
And forged ahead,
Success to earn.
He plodded on with
Faith and pluck;
And when he won,
Men called it luck.
--Anonymous

Inspirational Speech by IPS Vishwas Nangare Patil

Watch, Hear and get motivated!!
He is an IPS officer from Maharashtra Cadre and an extraordinary orator.

To watch videos on YouTube Click here..

IPS Vishwas Nangare Patil Speech


Tuesday, March 27, 2012

भय इथले संपत नाही - कवी ग्रेस (Bhaya ethale sampat nahi - Poet Grace)

आपणा सर्वाना त्यांच्या कविता व लेखनाने वेड लावणारे कवी ग्रेस आज आपल्यात प्रत्यक्षात नसले तरी त्यांच्या काव्यामुळे कायम स्मरणात राहतील यात शंका नाही. त्यांचीच एक लोकप्रिय कविता

भय इथले संपत नाही 

भय इथले संपत नाही 
मज तुझी आठवण येते 
मी  संध्याकाळी  गातो 
तू मला शिकवलेली गीते  

ते चंद्र सजणाचे 
ती धरती भागवि माया  
झाडांशी निजलो आपण 
झाडांत पुन्हा उगवाया 

तो बोल मंद हळवासा 
आयुष्य स्पर्शुनी गेला  
सीतेच्या वनवासातील 
जणू अंगी राघव शेला 

स्तोत्रात इंद्रिये अवघी 
गुणगुणते दु:ख कुणाचे 
 हे सरता संपत नाही 
चांदणे तुझ्या स्मरणाचे 
 
भय इथले संपत नाही 
मज तुझी आठवण येते  
-कवी ग्रेस 



कवी ग्रेस उर्फ  माणिक गोडघाटे 
काव्यसंग्रह : संध्याकाळच्या काविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांजभयाचे साजणी, 
चंद्रमाधवीचे प्रदेश 
साहित्य अकादमी पुरस्कार २०११ : वाऱ्याचे हलते रान 
 

Monday, March 26, 2012

शायरी हौसला (Housla Shayari)

शायरी हौसला  

मंझील उन्हीको मिलती है
जिनके सपनो मे जान होती है 

युही पंख होणे से कूच नाही होता 
हौसलो से उडान होती है   

Saturday, March 24, 2012

IF YOU THINK

Very very beautiful words...Read it once you will read it again.

IF YOU THINK
 
If you think you are beaten, you are.
If you think you dare not, you don't!
If you like to win, but think you can't,
It's almost a cinch you won't.
you think you'll lose, you're lost;
For out in the world we find
Success begins with a fellow's will;
It's all in the state of mind.
If you think you are outclassed, you are,
You've got to think high to rise,
You've got to be sure of yourself before 
You can ever win a prize.
Life's battles don't always go
To the stronger and faster man,
But sooner or later the man who wins
Is the man who thinks he can.

Thursday, March 22, 2012

Get all updates by Email

Hello!
Now you can get all updates about this blog by email in just one step..
Just enter your Email ID in Follow by Email Tab on Right side of Page.
Bye..

Thursday, March 15, 2012

गझल

गझल - जगजीत सिंह 

काँटों की चुभन पायी फूलों का मज़ा भी,
दिल दर्द के मौसम में रोया भी हँसा भी,
आने का सबब याद न जाने की ख़बर है,
वो दिल में रहा और उसे तोड़ गया भी,
हर एक से मंजिल का पता पूछ रहा है,
गुमराह मेरे साथ हुआ रहनुमा भी,
‘गुमनाम’ कभी अपनों से जो गम हुए हासिल,
कुछ याद रहे उनमे तो कुछ भूल गया भी, गझल

Tuesday, March 13, 2012

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है

 मिर्झा गालिब यांची एक अत्यंत सुरेख व मनाला भावणारी गझल...
दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है
आख़िर इस दर्द की दवा क्या है?
हमको उनसे वफ़ा की है उम्मीद
जो नहीं जानते वफ़ा क्या है।

हम हैं मुश्ताक़ और वो बेज़ार
या इलाही ये माजरा क्या है।

जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा ऐ ख़ुदा क्या है।

जान तुम पर निसार करता हूँ
मैंने नहीं जानता दुआ क्या है।
-मिर्झा गालिब 

Sunday, March 04, 2012

शाळा - चित्रपट व कादंबरी

शाळा चित्रपट व कादंबरी 
काल शाळा कादंबरी वाचायला घेतली आणि आज पूर्ण केली. शाळेच्या त्या सुंदर दिवसाचे पुस्तक पुन्हा बऱ्याच दिवसांनी उलगडले. मिलिंद बोकील यांच्या लेखनाने खरोखर आपण पुन्हा एकदा शाळेत जायला मिळाले. अतिशय सुंदर शब्द, नितळ वर्णन. मनाला खरोखर खूपच भावलं, तुम्हाला जमलं तर एकदा जरूर वाचा... जोशी आणि शिरोडकर आयुष्यभर लक्षात राहतील. शाळेत गेलेल्या प्रत्येकाने नक्की एकदा तरी पाहावा असा चित्रपट.. परंतु मला चित्रपटापेक्षा कादंबरीच फार आवडली.. तुम्ही सुद्धा चित्रपट पहिला असला तरी एकदा कादंबरी वाचली कि तुम्हाला माझे म्हणणे पटेल..
चित्रपट पहा व कादंबरी हि जरूर वाचा ..    

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी - यशवंत

आई या शब्दाची महती पुरेपूर वर्णन करणारी कविता 
हि कविता वाचल्यावर डोळे पाण्याने भरले नाही तर नवलच......  

आई' म्हणोनी कोणी, आईस हाक मारी - यशवंत

आई'  म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोक्कारी
नोहचे हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी
ही न्यूनता सुखाची, चिती सदा विदारी 
स्वामी तीनही जगाचा आईविना  भिकारी.......
चारा मुखी पिलांच्या , चिमणी  हलूच देई
गोठात वासाना , या चाटतात गाई
वात्सल्य हे पशुंचे ,मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा , व्याकूळ मात्र होई
वात्सल्य माउलीचे ,आम्हा जगात नाही
दुर्भाग्य  याविना का, आमहास नाही आई ........
शालेतुनी घराला, येता धरील पोटी
काढून ठेवलेला, घालील घांस ओठी
उष्ट्या  तशा मुखाच्या , धावेल चुंबना ती
कोण तुझ्याविना गे ,का या करील गोष्टी
तुझ्याविना गे कोणी, लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया , आम्हा  'शुभं करोती'.........
ताईस या कशाची, जाणीव नाही काही
त्या सान बालिकेला, समजे न यात काही
पाणी ततारना , नेत्रात बावरे ही
ऐकुनी घे परंतु,  आम्हास  नाही आई
सांगे त्से मुलीना, आम्हास नाही आई
ते बोल येत कानी, आम्हास नाही आई ................
आई, तुझयाच ठाई, सामर्थ्य नंदिनीचे
माहरे मंग्लाचे , अदतै ताप्सांचे
गांभीर्य  सागराचे, औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे , तया शांत चंद्रीकेचे 
वास्तव्य  या गुणांचे,  आई तुझ्यात  साचे..............
गुंफुनी पूर्वजांच्या, मी गाइले गुणांला
सार्या सभाजनानी  , या वानिले कृतीला
आई, कराव्या तू नाहीस कौतुकाला
या नयुनतेमुले ही, मज तयाजय ही पुषपमाला
पंचारती जनांची, ना तोषवी मनाला
पाही जीव बालकाचा, तव कॉतुका भुकेला..........
येशील तू घराला, परतून केधवा  गे
दवडू नको घडीला, ये ये निघून वेगे
हे गुंतले जीवाचे, पायी तझ्याच धागे
कर्तव्य  माउलीचे , करन्यास येई वेगे 
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे 
 ये रागावाही परी  येई येई वेगे...........

Monday, January 30, 2012

देणा-याने देत जावे - - विंदा करंदीकर


आणखी एक कविता आपल्या सर्वासाठी 
विंदानी या कवितेतून आपल्याला जे जे या निसर्गात श्रेष्ट आणि उत्तम आहे,
ते ते त्याच्याकडून घेण्याचा, शिकण्याचा एक नवीन मार्ग दाखविला आहे.
असं मला वाटत. 
तेव्हा एकदा जरूर वाचा. 

देणा-याने  देत जावे 

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे

हिरव्या पीवळया माळावरनी
सह्याद्रीच्या कडावरनी
छातीसाठी ढाल घ्यावी

वेद्यापिश्या ढगाकडून
वेडेपिसे  आकार घ्यावे
रकामधल्या प्रश्नासाठी 
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या  दर्याकडून 
पिसाळलेली आयाळ घ्यावी 
भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणा-याने देत जावे
घेणा-यान घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे  हात घ्यावे 

- विंदा करंदीकर

Thursday, January 26, 2012

HAPPY REPUBLIC DAY !!

Dear All Indians,
Wish you all a very HAPPY REPUBLIC DAY!!
Remember our duties towards our great nation.
JAI HIND!!

Wednesday, January 18, 2012

कणा -कुसुमाग्रज (Kusumagraj)


शाळेत शिकलेली परंतु अजून न विसरलेली 
आपण सर्वाना परिस्थितीशी न हरता सदैव लढायला शिकवणारी 
हि एक कविता 

कणा

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
कणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहुन
गंगामाई पाव्हणी आली गेली घरटात राहुन 
माहरे वाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
पसाद महणुन पापणयांमधय पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संग सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक लढ म्हणा!

-श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज 

Saturday, January 14, 2012

तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला


तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला 
तुमचा मित्र
निलेश  गावडे