Monday, April 30, 2012

I too had a love story by Ravinder Singh

I too had a love story by Ravinder Singh
            I too had a love story is a story of Ravin and Khushi which is based on the real life of Ravinder Singh. Khushi was working in an IT company in Delhi and Ravin was working in an IT company Bhubaneshwar. Ravin and Khushi met through the 20th century's great innovation computer and "www". i.e.on shaadi.com
            This is story which happened in 2006-07. Both started talking over the phone and fell in love. Later they decided to move ahead and get marry. But destiny had written something else, Khushi met an accident while coming back from office just two days before their engagement, and everything turned into a very heartbreaking scene. She passed away in the hospital after few weeks..
             I don't know why I liked the book., because of its simplicity or becasuse of commitment and respect both showed towards love, in fact there are many aspects. Everyone, who believes in love, who doesn't believe in love, who was in love, is in love or wish to be in love must read this story.. I am sure they will also like it. I have read a couple of love stories, some true, some imaginary, but all of them had a common thing-"Happy End". But this story doesn't have end at all. As Ravin says "Love story doesn't have the end"..

Saturday, April 28, 2012

सचिन 'देव' गाभाऱ्यातून बाहेर ?

सचिन 'देव' गाभाऱ्यातून बाहेर ?

भारतीय संघ त्यावेळी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. १९८९ चा तो काळ असेल. सचिन रमेश तेंडुलकरने कसोटीत पदार्पण केले होते. त्याने फार काही केले नव्हते. अर्थात तशी अपेक्षाही त्या काळी नव्हती. पण अब्दुल कादिरसारख्या बोलरला त्याने फोडले होते. त्याचवेळी गावसकर मागे पडला आणि सचिन हा नवा अवतार पुढे आला. लगेचच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने सेंच्युरी ठोकली आणि मग हा अवतार अधिकच आक्रमक होत गेला. कोणताही बोलर त्याच्या तावडीतून सुटला नाही. कोणताही देश त्याच्या आक्रमणाला थोपवू शकला नाही. शाहीद आफ्रिदी, इंजमामसारखे "प्रतिसचिन' केव्हाच इतिहासजमा झाले. पण सचिन तो सचिनच राहिला.

विक्रमांचे विक्रम करीत त्याची घौडदौड सुरू असताना, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन डेमध्ये त्याने २०० धावा केल्या आणि माझ्याप्रमाणेच जगभरातील लाखो चाहत्यांनी सचिनला "देव' मानले. सुनील गावसकर (दुर्देवाने हे स्थान त्याला मिळू शकले नाही. पण तोही त्याकाळात "देव'च होता.) मागे पडून देव्हाऱ्यात सचिनची मूर्ती ठेवली गेली. सचिन नावाचा "देव' सर्वत्र होता. त्याला "देव' मानणाऱ्या अनेकांपैकीच एक विनयकुमार नावाचा चाहता त्याची एकही मॅच चुकवित नव्हता. कोणत्याही सामन्यात हा अंगावर "सचिन तेंडुलकर' लिहून उभा असायचा. २०११ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिनने त्याच्या हाती वर्ल्ड कप दिला आणि समस्त चाहत्यांना अभिवादन केले. त्या कृतीने त्याचे देवत्व सिद्ध केले होते. आमचा "देव' कधी चुकत नाही ही आमची भावना त्यानेही जपली होती.

पैशाच्या मागे धावणारा सचिन, एक शतक ठोकता न येणारा सचिन, आता तो म्हातारा झाला आहे, त्याने रिटायर व्हायला हवे, अशा विधानांवर आमचा संताप संताप होत होता. आमचा "देव'आमचे ऐकतो, असेच आम्ही मानत आलो. म्हणूनच त्याने या सर्व "नास्तिकांना' असे फटके द्यावेत, की ते पुन्हा उठता कामा नयेत, अशीच प्रार्थना आम्ही केली. त्याने आमचा "धावा' ऐकला. "देवा'ने असे काही फटकारले की थोबाडे बंद झाली.

त्याला पद्मविभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशा अनेक किताबांनी त्याला गौरविले गेले. त्यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरून येत होता. हवाई दलात त्याला "ग्रुप कॅप्टन' केले तेव्हा तर आनंद गगनात मावत नव्हता. तो काही लढणार नव्हता, पण तरीही त्याच्या त्या कृतीने अनेकांना हवाई दलात जावेसे वाटले असेल. त्याला कधी एकदा "भारतरत्न' मिळेल याची उत्सुकतेने वाट पाहात राहिलो. पण ते काही होत नव्हते.

या सर्व लाईफमध्ये "देव' कधीच चुकला नव्हता. अगदी "मुंबई सर्वांची आहे' असे (अनेकांना) दुखावणारे वक्तव्य त्याने करूनही आम्ही त्याचे समर्थनच केले. त्याने कोट्यवधी रुपये कमविले. स्टीव्ह वॉ कोलकात्यात समाजसेवा करत असताना आमचा "देव' काहीच का करीत नाही, असा प्रश्नही आम्हाला कधी पडला नाही. ज्यांनी विचारला त्यांची तोंडेही आम्ही बंद केली. राहुल द्रविडसारखा गुणवान खेळाडू निवृत्त होत असताना, त्याच्या गौरवासाठीही हा "देव' का गेला नाही, यावरही आमच्याकडे उत्तर नव्हते. तरीही आम्ही दडपून हाणले. सिद्धीविनायक, बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात म्हणून आम्ही कधी तिथे गेलो नाही. पण शाळा, कॉलेज, नोकरी सारे काही बाजूला ठेवून, प्रसंगी पोलिसांच्या काठ्या झेलत या "देवा'चे दर्शन घेत राहिलो. "देवा'चा अपमान करणाऱ्या कपिललाही आम्ही सोडले नाही. आम्ही अंधश्रद्धाविरोधी आहोत. पण तू सत्यसाईबाबांच्या चरणी गेलास, तरी आम्ही नाराज झालो नाही. उलट तुझ्या श्रद्धेचे गोडवेच गायले.

असा हा आमचा "देव'. कालपर्यंत तो कधीच चुकत नव्हता. पण आज मात्र हा "देव'चुकला असेच वाटले. एक पायरी सोडून खाली आला आणि केवळ खासदारकी मिळावी यासाठी चक्क "10 जनपथ'च्या दाराशी गेला. एरवीही महाराष्ट्र याच पत्त्यावर लोटांगण घालत असताना, आता "देवा'नेही असेच का करावे? हा "देव' तेथे गेल्याने म्हणे राजकारण शुद्ध होणार आहे, असे म्हणणारे म्हणोत पण आम्ही काही तेव्हढे भाबडे नाही. आम्हाला आमचा "देव' या पत्त्यावर नको होता. तरीही तो तेथे गेला. ज्याची कुठेही तपासणी होत नाही त्या "देवा'ला भेटीचा परवानाही आहे ना, हे दारावरच्या सिक्‍यिुरिटीने तपासून पाहिले. मगच त्याची गाडी आत येऊ दिली. हा अपमान आमच्या जिव्हारी लागला. कारण आमचा "देव' चाहत्यांऐवजी पैशाच्या, सन्मानाच्या मागे गेला. सामान्यांचा सत्कार स्वीकारण्याऐवजी अंबानींच्या पार्टीला त्याने महत्त्व दिले. पैसा, सन्मान, किताब यासाठी तो कोणाशीही मैत्री करायला तयार आहे. "देवा'नेच गाभारा सोडला याचेच वाईट वाटते आहे.

एक निस्सीम चाहता

 खासदार तेंडुलकर यांना काही प्रश्न
1) जन्माने परकीय असलेल्या व्यक्तीस देशाचे पंतप्रधानपद देण्यास राजकीय पक्षांचा विरोध आहे. आपले मत काय?
2) लोकपाल विधेयकासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात? त्याबद्दल आपली भूमिका काय आहे?
3) कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांना शिक्षा व्हावी असे आपणास वाटते काय?
4) अफजल गुरु याला अद्याप फाशी झालेली नाही. ती तातडीने व्हावी असे आपणास वाटते काय?
5) अयोध्येत राममंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही तोडगा सुचविणार आहात काय? असल्यास तोडगा काय?
6) गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी यांना शिक्षा व्हावी असे आपले मत आहे काय?
7) काश्‍मीरप्रश्नी केंद्र सरकारने कोणती भूमिका घ्यावी असे आपणास वाटते?
8) बेळगावात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारावर आपण आंदोलन करणार काय?
9) मुंबईवर पहिला हक्क कोणाचा? मराठी माणसांचा की परप्रांतियांचा?
10) महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दिल्लीत कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात? 
(दैनिक सकाळ मधून साभार  )

Sunday, April 22, 2012

मराठी चित्रपट - अजिंठा

मराठी चित्रपट - अजिंठा 
              भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही वाकाटकचालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्मिली गेली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. एक युरोपिअन प्रवासी कॅप्टन जॉन बेंजामिन सिली याने इ.स. १८१० मध्ये वेरूळ लेण्यांना भेट दिली होती. मुंबईहून पायी प्रवास करुन तो वेरूळला पोहोचला होता. द वंडर्स ऑफ एलोरा या १८२५ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्याने वेरूळ आणि आजूबाजूच्या परिसराची इत्थंभूत हकीकत लिहिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इ.स. १८१९ मध्ये जॉन स्मिथ या ब्रिटीश कप्तानाने अजिंठा लेण्याच्या शोध लावला. 
             अजिंठा चित्रपट हा ब्रिटीश अधिकारी रोबर्ट गिल व पारो या दोघामधील प्रेम कथेवर आधारित आहे. त्याचबरोबर हा चित्रपट अजिंठा लेण्याच्या संशोधनातील सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो.  या चित्रपटातील माहितीनुसार, लेनापूर गावातील आदिवासी महिला पारोनेच या लेणी शोधल्या आहेत. तसेच या चित्रपटात अजिंठा लेण्यांच्या सौंदर्याचे एका नव्याप्रकारे दर्शन घडते. नितीन चंद्रकांत देसाई यांनी नेहमीप्रमाणे प्रत्येक बाब परिपूर्ण असण्याकडे लक्ष दिले आहे.

Monday, April 16, 2012

IPS Vishwas Nangare Patil Speech

One more speech by IPS Vishwas Nangare Patil at SIT Pune.

To watch, click here

http://www.youtube.com/watch?v=5kRwUUOmH-4&feature=related
http://www.youtube.com/watch?v=1jP3nagNxOo&feature=related

This videos are in parts I will update rest as soon as possible.

Wednesday, April 11, 2012

Wednesday, April 04, 2012

DON'T QUIT

It is really a very good inspirational poem.. Have a look..

DON'T QUIT

When things go wrong,
As they sometimes will,
When the road you're trudging seems all uphill,
When the funds are low and the debts are high,
And you want to smile, but you have to sigh,
When care is pressing you down a bit
Rest if you must, but don't you quit.
Life is queer with its twists and turns,
As every one of us sometimes learns,
And many a failure turns about
When he might have won had he stuck it out.
Don't give up though the pace seems slow
You may succeed with another blow.
Success is failure turned inside out
The silver tint of the clouds of doubt,
And you never can tell how close you are,
It may be near when it seems so far ;
So stick to the fight when you're hardest hit
It's when things seem worst that you mustn't quit.