Thursday, October 24, 2013

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा

लहानपणी खुपदा ऎकलेलं हे बालगीत ऐकल की, पुन्हा एकदा लहान व्हावासं वाटत.....  


ससा तो ससा की कापूस जसात्याने कासवाशी पैज लाविली,वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली।
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले।

ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहीयले
वाटेत थांबलेना कोणाशी बोललेना
चालले लुटुलुटु पाही ससा।

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा।
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडच्या सावलीत झोपे ससा।

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
"निजला तो संपला" सांगे ससा।

गीत - शांताराम नांदगावकर

Monday, September 16, 2013

संत तुकाराम महाराजांचे अभंग


संत तुकाराम महाराजांचे अभंग 

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥



गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥



विठो माउलिये हा चि वर देईं ।
संचरोनि राहीं ह्र्दयामाजी ॥२॥



तुका म्हणे कांही न मागे आणीक ।
तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

Thursday, August 22, 2013

पाऊस कधीचा पडतो - कवी ग्रेस

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने,
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती,
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला,
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा,
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा
- कवी ग्रेस

कवी ग्रेस उर्फ  माणिक गोडघाटे 
काव्यसंग्रह : संध्याकाळच्या काविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांजभयाचे साजणी, 
चंद्रमाधवीचे प्रदेश 
साहित्य अकादमी पुरस्कार २०११ : वाऱ्याचे हलते रान 

Saturday, July 06, 2013

अनामवीरा - कुसुमाग्रज

              आज भारतातील सर्व व्यवस्थावरील जनमानसाचा विश्वास डळमळीत झाला असला तरीसुद्धा एका वर्दीवर अजूनही सर्वांचा मनापासून विश्वास आहे आणि ते म्हणजे "भारतीय सैन्य!" उत्तराखंडमधील महाप्रलय असो किंवा कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याने सतत प्राण पणाला लावून भारतीयांचे रक्षण केले आहे. कर्तव्यासाठी प्राणाचीही पर्वा न करणाऱ्या याच सैनिकासाठी कुसुमाग्रजांची हि कविता  

अनामवीरा, इथे जाहला तुझा जीवनांन्त 
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात 

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी  
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी 

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा 
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा 

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव 
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव  

जरी न गातील भाट  डफावर तुझे यशोगान 
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान 

काळोखातुनी विजयाचा हे पहाटचा तारा 
 प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युन्जय वीरा 

कुसुमाग्रज 

Friday, June 07, 2013

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला
"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"

"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"
"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक,
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"

"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"
"काय करू आता माझ्याने manage होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"

"इमिग्रेशनच्या रिक्वेस्टने सिस्टीम झालीये hang,
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"
"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात,
माझ्याकडच्या फाईल्स नुसत्या वाढतच राहतात"

"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation
management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"
"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"


"असं कर बाप्पा एक Call Center टाक,

तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"
"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको
परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला,
"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"
"CEO ची position, Townhouse ची ownership,
immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"

मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"
अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?
"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"

"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव,
प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"
"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"

"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं,
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"
"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार,
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"

"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"

"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय,
पोरा, "सुखी रहा" म्हणाला......

Wednesday, May 15, 2013

माझी मायं-नारायण सुर्वे

माझी मायं

हंबरून वासराले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं...
दिसती माझी मायं

रे हंबरून वासराले..

आया बाया सांगत व्हत्या,
व्हतो जवा तान्हादुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा,पीठामंदी… पीठामंदीपीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय..तवा मले पीठामंदी दिसती माझी मायं....दिसती माझी मायं

रे हंबरून वासरले..

कण्या काट्या वेचायला मायं जाई रानीपायात नसे वाहन तिच्या,फिरे अनवाणीकाट्याकुट्या...रं काट्याकुट्याकाट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पायंतवा मले काट्यामंदी दिसती माझी मायं... दिसती माझी मायं

रे हंबरून वासरले..

बाप माझा रोज लावी,मायेच्या मागं टूमनंबास झालं शिक्षाण आता,घेऊदे हाती कामंआगं शिकूनं शानं...गं शिकूनं शानंशिकूनं शानं कुठं मोठा मास्तर व्हणार हायंतवा मले मास्तरमंदी दिसती माझी मायं....दिसती माझी मायं

रे हंबरून वासरले..

दारू पिऊन मायेला मारी जव्हा माजा बापंथरथर कापे अन् लागे तिले धापंकसा ह्याच्या...रं कसा ह्याच्याकसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायंतवा मले गायीमंदी दिसती माझी मायं....दिसती माझी मायं

रे हंबरून वासरले..


नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणीसांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणीनं भरल्या डोळ्यान...नं भरल्या डोळ्यानभरल्या डोळ्यान कवा पाहील दुधावरची सायंतवा मले सायीमंदी दिसती माझी मायं...दिसती माझी मायं

रे हंबरून वासरले..


गो म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटीपुन्हा एकदा जनम घ्यावा गं माये तुझ्या पोटीतुझ्या चरणी...गं तुझ्या चरणीतुझ्या चरणी ठेऊन माथा धरावं तुझं पायंतवा मले पायामंदी दिसती माझी मायं...दिसती माझी मायंरे हंबरून वासरले चाटती जवा गायंतवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं...दिसती माझी मायं

   "आई" ची महती शब्दात मांडणे अशक्य आहे. परंतु या कवितेत आईची महती पुरेपूर वर्णिली आहे.
ही कविता मूळ हिंदीतील आहे. कवी श्री. नारायण सुर्वे ह्यांनी या कवितेचे मराठीत भाषांतर केले.
जितेंद्र जोशी ह्यांनी ही कविता "झी मराठी" वर झालेल्या "स्वरतरंग" ह्या कार्यक्रमात सादर केली तेव्हापासून हि कविता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली.

त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



Friday, May 03, 2013

एकटा बरा आहे - मंगेश पाडगांवकर

एकटा बरा आहे 
येथ मी खरा अहे 

संगती नको कोणी 
कोवळा झरा आहे 

गुज  सांगती पक्षी ... 
हासरी धरा आहे 

फुलपाखरांची या 
लाडकी तऱ्हा आहे 

शांत या ढगांवरती 
रंग साजरा आहे 

स्पर्श ते नको त्यांचे 
ज्यांवरी चरा आहे 

बोलतो स्वतःशी मी 
शब्द लाजरा आहे
-मंगेश पाडगांवकर

Friday, April 26, 2013

सांगा कसं जगायचं? - मंगेश पाडगांवकर

सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

- मंगेश पाडगांवकर

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची " सांगा कसं जगायचं " ही कविता जगण्याचा मंत्रच देते. 

Friday, April 12, 2013

खाली डोकं, वर पाय! - मंगेश पाडगावकर

जेव्हा तिला वाटत असतं 
तुम्ही जवळ यावं  
जवळ यावं याचा अर्थ 
तुम्ही जवळ घ्यावं !
                अशा क्षणी चष्मा पुसत 
                तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
                व्यमिश्र अनुभूती शब्दांनी तोलत बसला, 
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

जेव्हा ती लाजत म्हणते,
"आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून,
तिला घट्ट जवळ घ्यायचं!
              भिजल्यामुळे खोकला होणार, 
              हे तुम्ही आधीच ताडलत;
              भिजणं टाळून खिशातून, 
              खोकल्याचं औषध काढलतं !
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

तिला गुंफायचा असतो, 
याच क्षणी श्वासात श्वास!
अनंततेवर काळाच्या 
तुमचा असतो दृढ विश्वास!
तुम्ही म्हणता थांब जरा!
आणि होता लांब जरा!
            तुम्ही चिंतन करीत म्हणता:
            दोन श्वासामध्ये जे अंतर असतं,
            काळाच्या पकडीत ते, 
            कधीसुद्धा मिळत नसतं!
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

भाषेच्या ज्ञानाने तर
तुम्ही महा पंडित असता ,
व्याकरणाचे बारकावे 
त्याचे तुम्ही पंडित असता !!
            ती ओठ जवळ आणते;
            व्याकरणात तुम्ही शिरता,
            ओठ हे सर्वनाम?
            याचा तुम्ही विचार करता!!
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय 

-मंगेश पाडगावकर 

Friday, April 05, 2013

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी-मंगेश पाडगावकर

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे

मिलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

-मंगेश पाडगावकर 

Thursday, March 21, 2013

चिऊताई, चिऊताई दार उघड !-मंगेश पाडगावकर

चिऊताई, चिऊताई दार उघड !
 
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !

गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !

फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !

बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !

-मंगेश पाडगावकर

Sunday, March 10, 2013

मेरे पास ख्वाबों की गठरी पड़ी है .. मैं चुन चुन के सपने तुम्हें बांटता हूँ ..



मेरे पास ख्वाबों की गठरी पड़ी है ..
मैं चुन चुन के सपने तुम्हें बांटता हूँ ..

गर्दिश में तारे भले आज हैं पर ..
मैं मेहनत की चक्की को फिर छांटता हूँ |

ये दुनिया फरेबी ! फरेबी सही ..
मैं सच की ही बाँहों में फिर जागता हूँ |

ठोकर भी लगती हैं, गिरता हूँ मैं ..
गिर के मैं उठता और फिर भागता हूँ |

आवाजें मेरी घुट गयी हैं कहीं ..
मैं नजरें उठा के फिर बोलता हूँ |

उलझते रहे हैं वो धागे मगर ..
मैं धागा नया एक फिर खोलता हूँ |

मैं खुद में सिमट के रोता भी हूँ ..
एक दिन हसूंगा पर ये जानता हूँ |

बाजी पे बाजी मैं हारा मगर ..
वही खेल खेलूं मैं ये ठानता हूँ |

फूलों में कांटे हैं बिखरे हुए ..
मैं छलनी पकड़ के उन्हें छानता हूँ |

मैं राहों पे चलता भटकता भी हूँ ..
मंजिल मिलेगी पर ये मानता हूँ |

Saturday, March 02, 2013

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? - मंगेश पाडगांवकर


सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?


भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर

गीतकार :मंगेश पाडगांवकर

Thursday, February 14, 2013

भातुकलीच्या खेळामधली - मंगेश पाडगावकर

 भातुकलीच्या खेळामधली

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥


राजा वदला , ``मला समजली शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''
कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥


राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा
``उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा ""
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥


तिला विचारी राजा, `` कां हे जीव असे जोडावे ?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥


कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?
कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?
वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥


गीतकार : मंगेश पाडगावकर 

गायक : अरुण दाते


Friday, February 08, 2013

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा-मंगेश पाडगांवकर

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

-मंगेश पाडगांवकर

Tuesday, January 29, 2013

आम्‍लेट- मंगेश पाडगावकर

कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली," पिल्‍लूबाळ,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले," आई,
दुसरे नको काही,
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

- मंगेश पाडगावकर

Saturday, January 19, 2013

मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं - मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत, 
मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं मन असं जडलं........

तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवून झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,

चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोस्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं
  -मंगेश पाडगांवकर 

कवी मंगेश पाडगांवकर यांच्याविषयी काही..

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला) हे मराठी कवी आहेत. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते.

 

विशेष प्रसिद्ध कविता

  • अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
  • फिदी फिदी हसतील ते?
  • दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
  • आम्लेट
  • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
  • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
  • सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
  • सलाम
  • फ़ूल ठेवूनि गेले
  • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

     गौरव

  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
  • अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) : सलाम कवितासंग्रहासाठी
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Friday, January 18, 2013

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं


Wednesday, January 09, 2013

समर्थ रामदास यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची केलेली स्तुती

समर्थ रामदास यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची केलेली स्तुती 
समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरु शिष्याची जोडी सर्वज्ञात आहे.
समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वाने घडवले, त्याला एक नवी ओळख करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महतीचे वर्णन समर्थ रामदासानी खालील शब्दात केले आहे.

निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी
यशवंत, कीर्तिवंत ! सामर्थ्यवंत, वरदवंत 
पुण्यवंत, नीतिवंत ! जाणता राजा


शिवरायाचे आठवावे रूप ! शिवरायाचा आठवावा प्रताप 
 शिवरायाचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी
शिवरायाचे कैसे  बोलणे ! शिवरायाचे कैसे चालणे 
शिवरायाचे सलगी देणे ! कैसी असे

सकळ सुखाचा केला त्याग ! करुनी साधिजे तो योग 
राज्यसाधनाची लगबग! कैसी केली

- समर्थ रामदास