आणखी एक कविता आपल्या सर्वासाठी
विंदानी या कवितेतून आपल्याला जे जे या निसर्गात श्रेष्ट आणि उत्तम आहे,
ते ते त्याच्याकडून घेण्याचा, शिकण्याचा एक नवीन मार्ग दाखविला आहे.
असं मला वाटत.
तेव्हा एकदा जरूर वाचा.
देणा-याने देत जावे
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
हिरव्या पीवळया माळावरनी
सह्याद्रीच्या कडावरनी
छातीसाठी ढाल घ्यावी
वेद्यापिश्या ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रकामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणा-याने देत जावे
घेणा-यान घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे
- विंदा करंदीकर
No comments:
Post a Comment