मराठी चित्रपट - अजिंठा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्मिली गेली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. एक युरोपिअन प्रवासी कॅप्टन जॉन बेंजामिन सिली याने इ.स. १८१० मध्ये वेरूळ लेण्यांना भेट दिली होती. मुंबईहून पायी प्रवास करुन तो वेरूळला पोहोचला होता. द वंडर्स ऑफ एलोरा या १८२५ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्याने वेरूळ आणि आजूबाजूच्या परिसराची इत्थंभूत हकीकत लिहिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इ.स. १८१९ मध्ये जॉन स्मिथ या ब्रिटीश कप्तानाने अजिंठा लेण्याच्या शोध लावला.
अजिंठा चित्रपट हा ब्रिटीश अधिकारी रोबर्ट गिल व पारो या दोघामधील प्रेम कथेवर आधारित आहे. त्याचबरोबर हा चित्रपट अजिंठा लेण्याच्या संशोधनातील सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटातील माहितीनुसार, लेनापूर गावातील आदिवासी महिला पारोनेच या लेणी शोधल्या आहेत. तसेच या चित्रपटात अजिंठा लेण्यांच्या सौंदर्याचे एका नव्याप्रकारे दर्शन घडते. नितीन चंद्रकांत देसाई यांनी नेहमीप्रमाणे प्रत्येक बाब परिपूर्ण असण्याकडे लक्ष दिले आहे.
No comments:
Post a Comment