मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं ..
दान घेतानाही..
झोळी हवी रिकामी,
भरता भरता थोडी ..
पुन्हा वाढलेली,
आपण फ़क्त घेताना..
लाजायचं नसतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं ..
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,
हवंय नको ते म्हणण प्रश्नच नसतो,
आपण फ़क्त दोन्ही हात..
भरून घ्यायच नुसत.
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं ..
- प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची गोष्ट या नाटकातील गीत
No comments:
Post a Comment