Tuesday, March 27, 2012

भय इथले संपत नाही - कवी ग्रेस (Bhaya ethale sampat nahi - Poet Grace)

आपणा सर्वाना त्यांच्या कविता व लेखनाने वेड लावणारे कवी ग्रेस आज आपल्यात प्रत्यक्षात नसले तरी त्यांच्या काव्यामुळे कायम स्मरणात राहतील यात शंका नाही. त्यांचीच एक लोकप्रिय कविता

भय इथले संपत नाही 

भय इथले संपत नाही 
मज तुझी आठवण येते 
मी  संध्याकाळी  गातो 
तू मला शिकवलेली गीते  

ते चंद्र सजणाचे 
ती धरती भागवि माया  
झाडांशी निजलो आपण 
झाडांत पुन्हा उगवाया 

तो बोल मंद हळवासा 
आयुष्य स्पर्शुनी गेला  
सीतेच्या वनवासातील 
जणू अंगी राघव शेला 

स्तोत्रात इंद्रिये अवघी 
गुणगुणते दु:ख कुणाचे 
 हे सरता संपत नाही 
चांदणे तुझ्या स्मरणाचे 
 
भय इथले संपत नाही 
मज तुझी आठवण येते  
-कवी ग्रेस 



कवी ग्रेस उर्फ  माणिक गोडघाटे 
काव्यसंग्रह : संध्याकाळच्या काविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांजभयाचे साजणी, 
चंद्रमाधवीचे प्रदेश 
साहित्य अकादमी पुरस्कार २०११ : वाऱ्याचे हलते रान 
 

No comments:

Post a Comment