सतत आपल्या मुलासाठी झटणाऱ्या आईची महती तसे शब्दात सांगणे कठीणच..
आईच्या वात्सल्याला पारख्या झालेल्या मनाची व्यथा सांगणारी माधव ज्युलिअन यांची हि कविता
प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलिअन
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ?
गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,
अन् राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना?
तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ;
नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते ,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते.
नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा,
आई हवी महणूनी सोडी न जीव हेका.
आई हवी महणूनी सोडी न जीव हेका.
विद्याधान्प्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.
आईविणे परी मी हा पोरकाच राही.
सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे ,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे .
आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे .
किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !
ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही
वाटे इथूनि जावे , तूझ्यापुढे निजावे
नेती तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे !
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
घे जन्म तू फिरुनी , येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !
माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांच्याविषयी थोडंस :
माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (२१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा - २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. हे पेशाने फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले.
(माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी
प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव
घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय यांना देण्यात येते .
माधव ज्यूलियनांनी दित्जू मा.जू. आणि एम ज्यूलियन या नावांनीही लिखाण केले
आहे. पटवर्धनांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि
संपादनही केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. त्यांचे
काही लिखाण इंग्रजीतही आहे.
पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्गसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर
येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे
त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. इ.स. १९३९मध्ये
माधव त्र्यंबक पटवर्धनांना मुंबई विद्यापीठाची डी.लिट्. ही पदवी मिळाली.
त्याच वर्षी त्यांचे निधन झाले.माधव ज्यूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरल्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत.
No comments:
Post a Comment