प्रेम कर भिल्लासारखं
पुरे झाले चंद्र, सूर्य पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरे त नजर बांधून रहा
सांग तिला तुझ्याच मिठीत आहे स्वर्ग सारा...
शेवाळलेले शब्द यमकछंद करतील काय ?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय ?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ?
म्हणून म्हणतो, जागा हो जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांचा भातुकळीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होवून जाळत राहणं
प्रेम म्हणजे जंगल होवून जळत जाणं ...
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमधून उगवूनसूधा मेघापर्यंत पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुज्यावारती झेंड्यासारख फडकू नकोस
उधळू न दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं
पेम कर भिल्लासारखंबाणावरती खोचलेलं ...
No comments:
Post a Comment