खूप दिवसांनी शाळेतील एक कविता आठवली..
त्या कवितेचा खरा अर्थ आता समजू लागला ....
शेवटची दोन कडवी तर खूपच सुंदर आहेत...
एकदा जरूर वाचा ...
श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची सुगरणीचा खोपा ही कविता....
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामध्ये जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा
तिची उलीशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुला देले रे देवान
दोन हात दहा बोट....
Add caption |
लहानपणी बहिणाबाई यांच्या कविता आम्हाला होत्या...
ReplyDeleteखरचं पुन्हा पुन्हा या कविता वाचाव्यात आणि पुन्हा पुन्हा लहानपण जगावं वाटते. मराठी चे शिक्षक , जिल्हा परिषद शाळा , बालमित्र , सर्व सर्व एका क्षणात जिवंत होतात जेव्हा कविता वाचण्यात येतात.