Showing posts with label Bahinabai. Show all posts
Showing posts with label Bahinabai. Show all posts

Thursday, October 25, 2012

अरे , संसार संसार - बहिणाबाई चौधरी


अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तव्हा मिळते भाकर !
 
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू  नही
राउळाच्या कयसाले , लोटा कधी म्हनू नही
 
अरे, संसार संसार, नही रडनं , कुढनं
येडा, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !
 
अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोडामधी कडू , बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा 
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
 
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चीक्नेसागरगोटे
 
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !
 
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
 
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !
                                   - बहिणाबाई चौधरी


Wednesday, May 23, 2012

मन वढाय वढाय - बहिणाबाई चौधरी

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या  पीकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखर पाखर
तयाची काय सांगू मात
आता वहत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
तयाले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जहरी जहरी
याच नयार रे तनतर
आरे इचू साप बरा
तयाले उतारे मनतर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतिब मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

-बहिणाबाई चौधरी 

Monday, May 14, 2012

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं

नही वार्‍यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं

पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं

निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं

ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं

येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं

नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं

अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं

दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं

इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं

ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं
- कवयित्री बहिणाबाई चौधरी  
श्रेष्ट कवयित्री बहिणाबाई चौधरी  यांचा थोडक्यात परिचय :
बहिणाबाई चौधरी (इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१) या प्रसिद्ध अहिराणी-मराठी कवयित्री होत्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
बहिणाबाई इ.स. १८८०मध्ये पूर्व खानदेशात (महाराष्ट्राच्या वर्तमान जळगांव जिल्ह्यातील) असोदा  गावी जन्मल्या. त्या अशिक्षित असल्या तरी त्यांची काव्यशैली अत्यंत प्रभावी व वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्या कवितातून निसर्ग व मनुष्याच्या आयुष्याचे सूक्ष्म बारकावे टिपले आहेत.त्यातूनच त्यांची प्रतिभा दिसून येते.
आजहि त्यांच्या कवितावर मराठी कविताप्रेमी तेवढेच प्रेम करतात, किंबहुना ते वाढतच आहे.

Tuesday, November 01, 2011

बहिणाबाई चौधरी यांची सुगरणीचा खोपा कविता

खूप दिवसांनी शाळेतील एक कविता आठवली..
त्या कवितेचा खरा अर्थ आता समजू लागला ....
शेवटची दोन कडवी तर खूपच सुंदर आहेत...
एकदा जरूर वाचा ...

श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची सुगरणीचा खोपा ही कविता....

अरे खोप्यामधी खोपा 
सुगरणीचा चांगला 
देखा पिलासाठी तिन
झोका झाडाले टांगला 

पिलं निजली खोप्यात 
जसा झुलता बंगला 
तिचा पिलामध्ये जीव 
जीव झाडाले टांगला 

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा 
पाखराची कारागिरी 
जरा देख रे माणसा

तिची उलीशीच चोच
तेच दात, तेच ओठ    
तुला देले रे देवान
दोन हात दहा बोट....

Add caption