एका तळ्यात होती
एका तळ्यात होती बदले पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक॥
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक॥
पिल्लास दु : ख भारी भोळे रडे स्वत:शी
भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाणयात पाहताना चोरुनिया क्षणेक
त्याचेच तया कळाले तो राजहंस एक ॥
- ग .दि . माडगूळकर
No comments:
Post a Comment