Monday, May 28, 2012

एका तळ्यात होती - ग .दि . माडगूळकर

एका तळ्यात  होती

एका तळ्यात  होती बदले पिले  सुरेख
होते कुरूप  वेडे पिल्लू  तयांत एक ॥

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वाहुनी  निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप  वेडे पिल्लू  तयांत एक॥

पिल्लास  दु : ख भारी भोळे रडे स्वत:शी 
भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप  वेडे पिल्लू  तयांत एक ॥

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे   पळाले
पाणयात पाहताना चोरुनिया क्षणेक
त्याचेच तया कळाले तो राजहंस एक ॥

- ग .दि . माडगूळकर

Wednesday, May 23, 2012

मन वढाय वढाय - बहिणाबाई चौधरी

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या  पीकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखर पाखर
तयाची काय सांगू मात
आता वहत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
तयाले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जहरी जहरी
याच नयार रे तनतर
आरे इचू साप बरा
तयाले उतारे मनतर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतिब मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

-बहिणाबाई चौधरी 

Wednesday, May 16, 2012

कोशिश

 कोशिश 
चंद्रगुप्त  : "किस्मत पहले हि लिखी जा चुकी है तो कोशिश करने से क्या मिलेगा ?
चाणक्य : " क्या पता किस्मत में लिखा हो की कोशिश से ही मिलेगा."


Monday, May 14, 2012

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं

नही वार्‍यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं

पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं

निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं

ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं

येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं

नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं

अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं

दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं

इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं

ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं
- कवयित्री बहिणाबाई चौधरी  
श्रेष्ट कवयित्री बहिणाबाई चौधरी  यांचा थोडक्यात परिचय :
बहिणाबाई चौधरी (इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१) या प्रसिद्ध अहिराणी-मराठी कवयित्री होत्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
बहिणाबाई इ.स. १८८०मध्ये पूर्व खानदेशात (महाराष्ट्राच्या वर्तमान जळगांव जिल्ह्यातील) असोदा  गावी जन्मल्या. त्या अशिक्षित असल्या तरी त्यांची काव्यशैली अत्यंत प्रभावी व वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्या कवितातून निसर्ग व मनुष्याच्या आयुष्याचे सूक्ष्म बारकावे टिपले आहेत.त्यातूनच त्यांची प्रतिभा दिसून येते.
आजहि त्यांच्या कवितावर मराठी कविताप्रेमी तेवढेच प्रेम करतात, किंबहुना ते वाढतच आहे.

Wednesday, May 09, 2012

हालात के कदमो पर सिकंदर नहीं गिरता

एक असाच कुठेतरी ऐकलेला शेर
हालात के कदमो पर सिकंदर नहीं गिरता 
टुटा कोई तारा जमीं पर नहीं गिरता 
गिरते है शौक से दर्या समंदर में   
लेकिन समंदर किसी दर्या में नहीं गिरता

Saturday, May 05, 2012

I want to grow up once again ….

       I want to grow up once again ….

             When I was a kid studying in school, I always looked forward to going to school: every June meant  new uniforms, new water bottles, tiffin boxes, typical fragrance of the unopened new books, wrapping cover to new books. Completing homework and chatting with friends in lectures, and after getting caught saying some false things to teacher.  Always doing crazy stuff in free lectures, while teachers bored me to death, looking outside the window and seeing mama ring the bell and getting high on it, biting off nails just before a surprise check, fumbling big time while speaking in front of the entire assembly, feigning that I am not feeling well when I had forgotten to do something which the teacher had asked me to do and getting her sympathy instead of the howlers… In these heaps of memories, I distinctly remember this teacher telling us, “live your life my children…live your life… It is your time right now… In school, everybody knows you…you have an identity for yourself, you are unique in your own ways…it is only going to happen in school…live your life…"
             Crazy that I was, I always looked forward to college life… hanging out with friends on college katta, bunking lectures, overuse of cell phones, "crushes"… the genre of books changed from harry potter, to that thing called love, notebook… yes, I had lost my identity, yes I was but a roll no 44 of class C, FC, 2006 batch. Professors and seniors kept telling us, “live your life people… this is now…make the most of it….what you are seeing right now is but a virtual image, a mirage of the actual world…whilst you are living this protected life, live it enjoy it” but, how stupid I was! I kept saying, growing up is fun…I wonder why these people keep saying this… I want to have a job, earn a living, come out of this protective shell of my parents and take that flight of independence
              And here I am today… again I have achieved that…but my life somehow revolves around the words TGIF and after Monday and Tuesday comes WTF, my bank account is happy but as they say no gains without pains...My recognition is my employee id… I forget it and I am not allowed to go in the premises where I am spending majority of my time these days… Number of people knowing me as a person can be counted on finger tips… In this vast expanse, I have lost me, I have lost self… It is like being a waiter in hotel… your presence is mandatory and yet nobody takes notice of you… Everybody around me has started gearing up for the next phase of life…they have started grooming themselves to take up the responsibilities of life and here I am stranded somewhere in between…new horizons beckon me and yet I wish, I could be with friends in college canteen having that breakfast, I so wish I could relive those preparatory leaves again… I have made the mistake of wanting to live the future before… I don’t want to repeat it… I don’t want to lose me… I want to nurture me...I want a time turner…I want it to halt if not turn back…I want a stop clock that stops time and not measures it...I want that sunshine, I want those rains, I want that another chance, I want to grow up once again...


  

(Note : this is an edited version of an article written by my friend.)

Tuesday, May 01, 2012

महाराष्ट्र अभिमानगीत

 महाराष्ट्र अभिमानगीत 

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


         हे गीत मराठी कवी सुरेश भट यांनी लिहिले असून कौशल इनामदार यांनी त्यास संगीत दिले आहे. ३५६ गायक, एक गाणे, एक गीतकार, एक चाल, एक ताल असे या गाण्याचे स्वरूप आहे. 
         ज्याला ४५० पेक्षा अधिक कलाकारांनी आपला आवाज बहाल केला आहे, असे मराठी अभिमानगीत हे बहुधा एकमेव गाणे असावे.  हे गाणे मराठी अभिमानगीत या अल्बममध्ये ठाण्यात २७ फेब्रुवारी, इ.स. २०१० रोजी, मराठी भाषा दिनी प्रकाशित झाले.
         मराठी अभिमानगीत हे ११२ प्रथितयश गायक-गायिकांनी व ३५६ होतकरू समूहगायकांनी गायले आहे. प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर,शाहीर विठ्ठ्ल उमपपासून अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, स्वानंद किरकिरे, अजित परब, स्वप्नील बांदोडकर, मुग्धा वैशंपायनपर्यंत गायक गायिका तसेच अशोक पत्की, श्रीधर फडकेपासून मिलिंद जोशी, मिथिलेश पाटणकरांपर्यंत बरेच संगीतकार या शिवाय अमराठी असलेले गायक-गायिका हरीहरन, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर अशा अनेकांनी अतिशय प्रेमाने यात सहभाग घेतला आहे. हे गाणे मुंबई, चेन्नई व ठाणे येथील ३ स्टुडियोंमध्ये ध्वनिमुद्रित झाले आहे. या ध्वनिमुद्रणात १२ ध्वानिकी अभियंत्यांचा व ६५ वादक कलाकारांचा सहभाग आहे.
या गाण्यात २५०० हून जास्त व्यक्तींचा प्रात्यक्षिक वा अ-प्रात्यक्षिक सहभाग आहे.



महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना हार्दिक शुभेच्छा 



 महाराष्ट्र दिनानिमित्त थोडसं..

महाराष्ट्र नावाचा उगम

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महाररट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती


हुतात्मा स्मारक,मुंबई
संयुक्त महाराष्ट्र चळवळ ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली 
                                     आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

       आज याच महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे, सोन्याचा इतिहास असणाऱ्या महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. तेव्हा आज महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राला त्याचे गतवैभव पुन्हा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..