Saturday, December 15, 2012

प्रेम म्हणजे काय असतं ? -मंगेश पाडगावकर

कविवर्य मंगेश पाडगावकरांची हि कविता एकदा ऐकली की कायम मनात गुणगुणत राहते...

प्रेम म्हणजे काय असतं ?

 प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे,फसल्या तर फसू दे!
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
 कॉनव्हेन्टमध्ये शिकलात तर्री प्रेम करता येतं;
सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
 जागेपणी स्वप्नाचे झोपाळे झुलू लागतात!

आठवत ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
 होडी सगळी पाण्याने भरली होती!
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो!
बुडलो असतो तरी चाललं असतं,
प्रेमानेच वर अलगद काढलं असतं!
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं!
कारण,  
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात 
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात!
असाच एकजण चक्क मला म्हणाला,
" आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही!
 आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?"
त्याला वाटलं मला पटलं!
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!"

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉंक्लेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने!
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास 
फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल!

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यानीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा!!
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं 
गट्ठ गट्ठ मिठीसुद्धा प्रेम असतं!
 प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
 -मंगेश पाडगावकर 



मंगेश पाडगावकर यांच्याविषयी थोडं...

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला) हे मराठी कवी आहेत. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते.
विशेष प्रसिद्ध कविता
  • अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
  • फिदी फिदी हसतील ते?
  • दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
  • आम्लेट
  • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
  • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
  • सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
  • सलाम
  • फ़ूल ठेवूनि गेले
  • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?


Tuesday, December 11, 2012

पेरावे तसे उगवते

पेरावे तसे उगवते  
कर भला, हो भला 
आपण जे करतो, वागतो, बोलतो तेच फिरून  आपल्याला मिळते. प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल तेवढेच किंबहुना, त्याहून थोडेसे कमी जर इतरांसाठी केले तर बरेच प्रश्न सुटतील. हा व्हीडीओ जरूर पहा.
क्लिक करा. A few minutes