Wednesday, January 18, 2012

कणा -कुसुमाग्रज (Kusumagraj)


शाळेत शिकलेली परंतु अजून न विसरलेली 
आपण सर्वाना परिस्थितीशी न हरता सदैव लढायला शिकवणारी 
हि एक कविता 

कणा

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
कणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहुन
गंगामाई पाव्हणी आली गेली घरटात राहुन 
माहरे वाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
पसाद महणुन पापणयांमधय पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संग सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक लढ म्हणा!

-श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment