Sunday, March 04, 2012

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी - यशवंत

आई या शब्दाची महती पुरेपूर वर्णन करणारी कविता 
हि कविता वाचल्यावर डोळे पाण्याने भरले नाही तर नवलच......  

आई' म्हणोनी कोणी, आईस हाक मारी - यशवंत

आई'  म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोक्कारी
नोहचे हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी
ही न्यूनता सुखाची, चिती सदा विदारी 
स्वामी तीनही जगाचा आईविना  भिकारी.......
चारा मुखी पिलांच्या , चिमणी  हलूच देई
गोठात वासाना , या चाटतात गाई
वात्सल्य हे पशुंचे ,मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा , व्याकूळ मात्र होई
वात्सल्य माउलीचे ,आम्हा जगात नाही
दुर्भाग्य  याविना का, आमहास नाही आई ........
शालेतुनी घराला, येता धरील पोटी
काढून ठेवलेला, घालील घांस ओठी
उष्ट्या  तशा मुखाच्या , धावेल चुंबना ती
कोण तुझ्याविना गे ,का या करील गोष्टी
तुझ्याविना गे कोणी, लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया , आम्हा  'शुभं करोती'.........
ताईस या कशाची, जाणीव नाही काही
त्या सान बालिकेला, समजे न यात काही
पाणी ततारना , नेत्रात बावरे ही
ऐकुनी घे परंतु,  आम्हास  नाही आई
सांगे त्से मुलीना, आम्हास नाही आई
ते बोल येत कानी, आम्हास नाही आई ................
आई, तुझयाच ठाई, सामर्थ्य नंदिनीचे
माहरे मंग्लाचे , अदतै ताप्सांचे
गांभीर्य  सागराचे, औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे , तया शांत चंद्रीकेचे 
वास्तव्य  या गुणांचे,  आई तुझ्यात  साचे..............
गुंफुनी पूर्वजांच्या, मी गाइले गुणांला
सार्या सभाजनानी  , या वानिले कृतीला
आई, कराव्या तू नाहीस कौतुकाला
या नयुनतेमुले ही, मज तयाजय ही पुषपमाला
पंचारती जनांची, ना तोषवी मनाला
पाही जीव बालकाचा, तव कॉतुका भुकेला..........
येशील तू घराला, परतून केधवा  गे
दवडू नको घडीला, ये ये निघून वेगे
हे गुंतले जीवाचे, पायी तझ्याच धागे
कर्तव्य  माउलीचे , करन्यास येई वेगे 
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे 
 ये रागावाही परी  येई येई वेगे...........

23 comments:

  1. Apratim .. SSC CHI ATHAWAN ALI

    ReplyDelete
    Replies
    1. ऐकुनी घे परंतु, आम्हास नाही आई
      सांगे त्से मुलीना, आम्हास नाही आई
      ते बोल येत कानी, आम्हास नाही आई ................

      Delete
    2. माझ्या लहानपणी माझी मोठी बहीण ही कविता म्हणायची खूपच सुंदर

      Delete
  2. सर्जनशील लेखन

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर!!

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर,खूपच छान

    ReplyDelete
  5. माझा बालपणी ची कविता आज वाचुन मी धन्य झालो खुप छान वाटलं

    ReplyDelete
  6. खुपच छान डोळयासमोर प्रतिमा तयार झाली

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर!

    ReplyDelete
  8. पहिल्यांदा कविता वाचली तेव्हा डोळे पाणावले होते 😞

    ReplyDelete
  9. जेव्हा जेव्हा ही कविता वाचते,ऐकते डोळे भरून येतात
    तसेच ईयत्ता ४थी ची आठवण होते व आमच्या वर्ग क्षिशिका ची पण

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप आठवणी येतात शाळेतील ....गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

      Delete
  10. Very nice 👍👍👍👍

    ReplyDelete
  11. शाळेत असतानाही आणि आताही माझ्या आवडीची कविता...खूप छान आहे मनाला स्पर्श करणारी...

    ReplyDelete
  12. अशे काही वाचल्यावर मन भरून येते

    ReplyDelete
  13. शत शत नमन

    ReplyDelete
  14. कुणाला.. रोज रोज तेच नको.. ही कविता माहिती आहे का

    ReplyDelete